मुंबई : राज्यातील घोटाळ्यांची चौकशी करणार आणि न दबता, न घाबरता कारवाई करण्यात येईल, असा इशारा मागील सरकारच्या घोटाळेबाज मंत्र्यांना नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मंत्रालय पत्रकारसंघातर्फे आयोजीत केलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. पत्रकारांनी घोटाळेबाज मंत्र्यांबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी कोणाचीही भीडभाड राखली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
माजी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजित पवार यांच्या संदर्भात हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, राज्याच्या हितासाठी कोणाविरोधातही आणि कधीही कारवाई करण्यात येणार आहे, न दबता, न घाबरता कारवाई होईल, असा इशारा अजित पवार आणि इतर मंत्र्यांना नवी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
पाहा काय म्हणाले फडणवीस
* शिवसेना आणि भाजपमध्ये सकारात्मक चर्चा होत आहे - - मुख्यमंत्री फडणवीस
* उद्धव ठाकरेंना मी फोन केला, तसेच अमित शहांनी फोन केला - मुख्यमंत्री फडणवीस
* मंचावर साधू-संत होते, आमचा विरोध श्रद्धेला नाही, अंधश्रद्धेला आहे - मुख्यमंत्री फडणवीस
* कॅबिनेट निर्णयांची माहिती देणार - मुख्यमंत्री फडणवीस
* पत्रकारांचे अधिक प्रेम विरोधी पक्षावर असते, आमच्यावरही प्रेम करण्याची संधी देणार - मुख्यमंत्री फडणवीस
* गतीशिलता आणि गतीमानता संकलीत करणार - मुख्यमंत्री फडणवीस
* सर्व समावेशक योजना राबविणार, पारदर्शी कारभार करणार - मुख्यमंत्री फडणवीस
* मागील अाश्वासनांच्या पूर्ततेसाठी आढावा घेणार - मुख्यमंत्री फडणवीस
* मागील सरकारचे आश्वासनं पूर्ण करायची तर ५२ हजार कोटींची कर्ज काढावी लागणार - - मुख्यमंत्री फडणवीस
* मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करणार - मुख्यमंत्री फडणवीस
* लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभार करणार - मुख्यमंत्री फडणवीस
* रोल बदलण्याने दडपण वाटते - मुख्यमंत्री फडणवीस
* इतके वर्ष पत्रकार परिषद घेतल्या दडपण वाटले नाही, आज वाटते - मुख्यमंत्री फडणवीस
* जनतेच्या अपेक्षाची जबाबदारी माझ्यावर - मुख्यमंत्री फडणवीस
* पारदर्शकता आणि कार्यन्वियता असावी - मुख्यमंत्री फडणवीस
* सेवा हमी विधेयक आणणार - - मुख्यमंत्री फडणवीस
* जनतेला सेवा मिळत नाही, म्हणून जनतेचा रोष असतो - मुख्यमंत्री फडणवीस
* प्रत्येक विभाग कोणती सेवा देतात, याची यादी तयार होणार - मुख्यमंत्री फडणवीस
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.