डान्सबारसाठी राज्य सरकारची नवी नियमावली

डान्स बारवरून सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर आता राज्य सरकारनं डान्स बारसाठी नवी नियमावली तयार केलीय. त्यानुसार डान्स बारमध्ये सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक करण्यात येणार आहे. 

Updated: Dec 6, 2015, 10:45 AM IST
डान्सबारसाठी राज्य सरकारची नवी नियमावली title=

मुंबई : डान्स बारवरून सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर आता राज्य सरकारनं डान्स बारसाठी नवी नियमावली तयार केलीय. त्यानुसार डान्स बारमध्ये सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक करण्यात येणार आहे. 

गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक डान्सबारमध्ये केवळ चारच डान्सर असणं बंधनकारक आहेत. चारपेक्षा अधिक डान्सर्स बारमध्ये ठेवता येणार नाहीत. डान्सर्स आणि ग्राहक यांच्यामध्ये किमान पाच फुटांचं अंतर राखणंही सक्तीचं करण्यात येणार आहे. 

त्याचबरोबर बारमध्ये नोटा उधळायलाही मनाई करण्यात येणार आहे. बारमध्ये धुम्रपानालावरदेखील बंदी घालण्यात येईल. डीएनए या वृत्तपत्राला सूत्रांनी दिलेल्या माहितीतून राज्य सरकारच्या या नव्या नियमावलीची माहिती पुढं आलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.