राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार लांबणीवर, दिल्लीतही गोंधळ

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण राज्यातलं भाजप आणि केंद्रीय नेतृत्व यांच्यामध्ये विस्ताराच्या मुहुर्तावरून एकमत होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातवरण आहे.

Updated: Dec 3, 2015, 06:56 PM IST
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार लांबणीवर, दिल्लीतही गोंधळ  title=

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण राज्यातलं भाजप आणि केंद्रीय नेतृत्व यांच्यामध्ये विस्ताराच्या मुहुर्तावरून एकमत होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातवरण आहे.

दिल्लीतून विस्तार याच आठवड्यात होईल, अशा बातम्या येत असताना राज्यातली सूत्र मात्र त्याविषयी कुठलही अधिकृत माहिती देण्यास तयार नाहीत. 

उलट आज मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या झालेल्या ४० मिनिटांच्या चर्चेत मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी कुठलीही चर्चा झालेली नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी भाजप कार्यकर्ते, इच्छुक, घटक पक्ष, शिवसेना सगळेच कमालीचे गोंधळात आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.