मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने शनिवारी बँकेचे कामकाज दोन तास जास्त चालणार असल्याचं जाहीर केलं आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सलग ५ दिवस बँका बंद राहणार आहेत, फक्त शनिवारी बँकेचं कामकाज चालणार असल्याने, महाराष्ट्रात शनिवारच्या कामकाजात दोन तासांची बँकेने वाढ केली आहे.
बॅंका २ एप्रिल रोजी आर्थिक वर्ष अखेरीमुळे तर २ एप्रिलला महावीर जयंती आणि ३ एप्रिलला गुड फ्रायडे निमित्त बंद राहणार आहेत. त्यानंतर ४ एप्रिलला अर्थात शनिवारी बॅंका सुरु राहणार असून पुन्हा रविवारी साप्ताहिक सुटीनिमित्त बॅंका बंद असणार आहेत.
ग्राहकांच्या सोयीसाठी ४ एप्रिल रोजी महाराष्ट्रामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या कामकाजाच्या वेळेत दोन तासांची वाढ करण्यात येणार असल्याचे आज कळविण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.