पुणे: पुणे महानगरपालिका हद्दीलगतची ३४ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आलाय. गरज पडल्यास या ३४ गावांची वेगळी महापालिका बनली जाऊ शकते, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलं.
आमदार अनंत गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री उत्तर देत होते. गरज पडल्यास या ३४ गावांची वेगळी महापालिका बनली जाऊ शकते. मात्र भौगोलिकदृष्ट्या ही पालिका पुण्याभोवती असेल. पुण्यातून कुठनही बाहेर पडतांना या पालिकेच्या हद्दीतून बाहेर पडावं लागेल. काही गावांचा पालिकेत समावेश व्हायला विरोध असल्यानं हा वेगळा प्रश्न आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
सध्या हा प्रस्ताव ग्रामविकास खात्याकडे आहे. त्यानंतर तो नगरविकास खात्याकडे येईल. त्यानंतर योग्य ते निर्णय घेतले जातील. या भागातील पायाभूत सोयी सुविधाकरिता पुणे पालिकेनं १०० टक्के अनुदानाची आवश्यकता राज्य सरकारला कळवली आहे. यासाठी ३ एक हजार कोटी लागण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.