राममंदिरावरून राऊतांनी भाजपला डिवचले...

 उत्तर प्रदेशात भाजपा बहुमत मिळाले आहे, आता लवकरच राम मंदिर बनवण्याची अपेक्षा शिवसेना खासदार  संजय राऊत व्यक्त केली आहे. राम का वनवास अब खत्म हुआ है, हम अभी राम मंदिर की अपेक्षा करते हैं, असं राऊत म्हणाले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 11, 2017, 03:56 PM IST
राममंदिरावरून राऊतांनी भाजपला डिवचले... title=

मुंबई :  उत्तर प्रदेशात भाजपा बहुमत मिळाले आहे, आता लवकरच राम मंदिर बनवण्याची अपेक्षा शिवसेना खासदार  संजय राऊत व्यक्त केली आहे. राम का वनवास अब खत्म हुआ है, हम अभी राम मंदिर की अपेक्षा करते हैं, असं राऊत म्हणाले.

 हिंदुस्थानाच्या पंतप्रधानांचे आम्ही अभिनंदन करतो, लोकशाही प्रक्रियेतून आलेले हे निकाल असल्याची प्रतिक्रियाही राऊत यांनी व्यक्त केली आहे. 
 
 या निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतील ? या प्रश्नावर राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणावर 8 दिवसांनंतर बोलता येईल, तोपर्यंत निकालांचा धुराळा खाली बसेल, सरकारे स्थापन होतील. 

शिवसेनेने मुंबई, महाराष्ट्रात भाजपची घोडदौड रोखली. आता सर्वाना शिवसेनेचे महत्व आणि ताकद कळाली असेल, असेही  संजय राऊत म्हणाले. 

लोकशाहिच्या प्रकियेतून आलेले हे निकाल आहेत, भाजपला मिळालेल्या या यशाचं आम्ही स्वागत करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आम्ही अभिनंदन करतो - संजय राऊत

लोकांना जिकडे पर्याय दिसला तिकडे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान केलं, उत्तर प्रदेशातलं राजकारण बद्दलवंत विजय हा विजय असतो - संजय राऊत

महाराष्ट्राच्या राजकारणावर या निकालाचा काही परिणाम होणार नाही - संजय राऊत

शिवसेनेचं महत्व आज लक्षात येईल, आम्ही मुंबईत मोदी लाट कशी थांबवली हे लक्षात आलं असेल - संजय राऊत

महाराष्ट्राच्या विषयावर आपण 8 दिवसानंतर बोलू, त्यानंतर काही उसळलेल्या लाटा थांबतील, अनेक सत्ता स्थापन केल्या जातील - संजय राऊत