Exclusive: देवेंद्र फडणवीस सर्वोत्कृष्ट माणूस; राज ठाकरेंनी केलं तोंडभरुन कौतुक, CM शिंदेंबद्दल म्हणाले 'ते इतके...'

Raj Thackeray on Devendra Fadnavis: राजकीय आणि तांत्रिक आकलन हे सर्वोत्कृष्ट असलेला माणूस देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहे. यामध्ये काही दुमत नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस हे कॉम्बिनेशन मस्त आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Nov 10, 2024, 03:57 PM IST
Exclusive: देवेंद्र फडणवीस सर्वोत्कृष्ट माणूस; राज ठाकरेंनी केलं तोंडभरुन कौतुक, CM शिंदेंबद्दल म्हणाले 'ते इतके...' title=

Raj Thackeray on Devendra Fadnavis: राजकीय आणि तांत्रिक आकलन हे सर्वोत्कृष्ट असलेला माणूस देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहे. यामध्ये काही दुमत नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस हे कॉम्बिनेशन मस्त आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे कॉम्बिनेशन मस्त आहे. तांत्रिकदृष्ट्या उत्तम आणि सढळ हाताने मदत करणारे हे उत्तम आहे असंही त्यांनी सांगितलं. तसंच राज्यात पुन्हा युतीचं सरकार येईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी भविष्यवाणी त्यांनी झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत केली आहे. 

Exclusive:'महाराष्ट्रात चिखल झालाय त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच!', राज ठाकरेंनी सर्वच उलगडून सांगितलं

Exclusive: '...म्हणून अमितसाठी भांडुपऐवजी माहीम मतदारसंघ निवडला', राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा

 

"एकनाथ शिंदेंनी जी गोष्ट केली ती अत्यंत योग्य केली. याचं कारण तुम्ही विचारप्रणाली, बाळासाहेब सर्वांना बाजुला काढलं आणि काँग्रेससोबत गेलात. धुसफूस यासह त्यांची वैयक्तिक महत्वकांक्षादेखील असेल. मुख्यमंत्री का केलं नाही असंही असेल. पण ज्याप्रकारे ती खेळी झाली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन बसणं हे कित्येक शिवसेना आमदार, शिवसैनिकांना पटलं नसेल. इतकी वर्षं ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्यासोबत एका व्यक्तीच्या स्वार्थासाठी जाऊन बसत आहोत. अडीच वर्षांचा काळ पाहिला तर हे दोन वर्षं आधीच झालं असतं. पण मध्ये कोविड आला," असं राज ठाकरे म्हणाले. 

'आमच्या आमदारांची गरज लागेल'

"राजकारणात काही गोष्टींच्या सीमा आपण आखल्या पाहिजेत. हे मी सर्व राजकीय पक्षांसाठी बोलत आहे. तुम्ही एखाद्या पक्षाचं नाव आणि चिन्ह काढून घेता कामा नये. उद्या शिंदेंकडे आमचे आमदार कमी झाले आणि कोणीतरी हे चिन्ह  आणि नाव आमचं सांगितलं तर. असं कधी होत नाही. राजकीय नैतिकता नावाची गोष्ट असते की नाही? की आपल्याला सर्वच गुंडाळून टाकायचं?," असा सवालही राज ठाकरेंनी विचारला. 

'एकनाथ शिंदे दिलदार मनाचा, लोकांना मदत करणारा माणूस'

एकनाथ शिंदेंना कधी तुमचं चुकलं आहे का? हे सांगितलं का असं विचारलं असता ते म्हणाले, "एकदा गोष्ट घडल्यानंतर त्याबाबत बोलण्याला काही अर्थ नाही. मला पटत नाहीत त्या गोष्टी एकनाथ शिंदेंकडून झाल्या असतील. पण तो माणूस दिलदार मनाचा, लोकांना मदत करणारा आहे. पुण्यात पूर आल्यानंतर मी त्यांना भेटलो आणि दोन मुल शॉक लागून गेल्याचं सांगितलं. त्यांनी एक मिनिटाचा विचार न करता कुटुंबासाठी 10 लाखांचे चेक साईन करायला लावले आणि पोहोचलेदेखील. राजकारणात राजकीय माणूस कंजूस असून चालत नाही. त्याने सढळ हाताने मदत करावी लागते. त्यांच्याकडे ती वृत्ती आहे".

'देवेंद्र फडणवीस राजकीय आणि तांत्रिक आकलन असलेला सर्वोत्कृष्ट माणूस '

त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळाकडे कसं पाहता? हे विचारलं असता म्हणाले, "देवेंद्र फडणवीस अशी सगळं माणसं त्यांच्यासोबत होती. राजकीय आणि तांत्रिक आकलन हे सर्वोत्कृष्ट असलेला माणूस देवेंद्र फडणवीस आहे. यामध्ये काही दुमत नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे कॉम्बिनेशन मस्त आहे. तांत्रिकदृष्ट्या उत्तम आणि सढळ हाताने मदत करणारे हे उत्तम आहे. युतीचं सरकार सत्तेत येईल असा माहोल आहे. पण आमच्या आमदारांशाविय सत्तेत बसतील असं वाटत नाही. त्यांना आमच्या आमदारांची गरज लागेल".

'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील'

"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं माझं भाकीत आहे. अमित शाहदेखील काही वेगळं सांगत असतील असं नाही. ते दोनदा बोलले. पुढील आव्हानं देवेंद्र फडणवीस सांभाळतील असं तेच म्हणाले. आता सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, पुढचं पुढे असंही ते म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावं म्हणून तिकडून येथे आले असतील असं मला वाटत नाही. आता भाजपाने त्यांना मुख्यमंत्री केलं. पण त्यावेळीही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीसच होते. त्याआधी मुख्यमंत्री होते. परत सरकार बसतंय तेव्हा ज्याचे सर्वाधिक आमदार त्याचाच मुख्यमंत्री बसतो," असं राज ठाकरेंनी सांगितलं. 

'मी चौथा भागीदार म्हणून काय करणार होतो'
 

"मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात माझा पाठिंबा नरेंद्र मोदींना आहे, पण विधानसभेच्या कामाला लागा असं सांगितलं. म्हणजे यांच्याशिवाय निवडणूक लढवतोय हे तेव्हा स्पष्ट केलं होतं. एखाद्या कंपनीत जे शेअरहोल्डर्स आहेत, त्यातीत प्रत्येकाचा अॅसेट किती हेच ठरलं नसताना चौथा पार्टनर जाऊन म्हणून मी काय करणार होतो. मी त्यांच्यात जाऊन काय करणार होतो? प्रत्येक जिल्हा, तालुक्यात माझी माणसं, लोकं, केडर, मतदार आहेत. मग माझं मला तर कळू देत. उद्या 23 तारखेनंतर जी काही स्थिती असेल ती पाहू आणि पुढे जाऊ," असं राज ठाकरे म्हणाले.