ढोल-ताशांच्या गजरात शिवसैनिकांचा मुंबई महापालिकेबाहेर जल्लोष

मुंबई महापालिकेवर भगवा फडकल्यानंतर शिवसैनिकांनी महापालिकेच्या बाहेर मोठा जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात शिवसैनिकांनी विजय साजरा केला. विशेष म्हणजे महिला आणि तरूणीही मोठ्या संख्येनं या जल्लोषात सहभागी होत्या.

Updated: Mar 8, 2017, 03:44 PM IST
ढोल-ताशांच्या गजरात शिवसैनिकांचा मुंबई महापालिकेबाहेर जल्लोष title=

मुंबई : मुंबई महापालिकेवर भगवा फडकल्यानंतर शिवसैनिकांनी महापालिकेच्या बाहेर मोठा जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात शिवसैनिकांनी विजय साजरा केला. विशेष म्हणजे महिला आणि तरूणीही मोठ्या संख्येनं या जल्लोषात सहभागी होत्या.

तरुणींनी ढोल आणि ताशाची कमान आपल्या हातात घेत विजयोत्सव साजरा केला. महापालिकेच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा आकर्षक पुतळा ठेवण्यात आला असून संपूर्ण परिसर भगव्या झेड्यांनी सजवला आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडैश्वर भरघोस मतांनी निवडून आले आहेत. शिवसेनेच्या उमेदवाराचा भाजपच्या 82 नगरसेवकांसह त्यांच्यासोबत असलेल्या एका अपक्षानंही पाठिंबा दिला. त्यामुळं शिवसेनेचे बहुमत थेट 171 पर्यंत पोहचला. तर काँग्रेसच्या विठ्ठल लोकरे यांना केवळ 31 मतं मिळाली.  राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही. तर मनसेचे सातही नगरसेवक मतदानाला गैरहजर राहिले आहेत.

शिवसेनेच्याच हेमांगी वरळीकर यांची उपमहापौरपदी निवड झाली.  दिर्घकाळांनंतर मुंबई महापालिकेत शिवसेनेचा उपमहापौर विराजमान झालाय.  महापौरपदाच्या निवडीसाठी शिवसेनेचे अनेक शिलेदार मुंबई महापालिकेत हजर होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदेंचा, ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक हे महापालिकेत आवर्जुन हजर होते.