अग्निशमन केंद्र नवीन वास्तू लोकार्पण सोहळ्यात शिवसेना-भाजपमध्ये दुरावा

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमधला दुरावा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज दादरच्या अग्निशमन केंद्राच्या नवीन वास्तूच्या लोकार्पणच्या सोहळ्याला भाजपच्या नेत्यांनी दांडी मारली.

Updated: Oct 19, 2016, 08:02 PM IST
अग्निशमन केंद्र नवीन वास्तू लोकार्पण सोहळ्यात शिवसेना-भाजपमध्ये दुरावा title=

मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमधला दुरावा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज दादरच्या अग्निशमन केंद्राच्या नवीन वास्तूच्या लोकार्पणच्या सोहळ्याला भाजपच्या नेत्यांनी दांडी मारली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा लोकापर्णाचा कार्यक्रम झाला. भाजपच्या बड्या नेत्यांनी आधीच कार्यक्रमाला येण्यास नकार दिला होता. पण उपमहापौर अलका केरकर आणि गटनेते मनोज कोटक हे सुद्धा कार्यक्रमाकडे फिरकलेले नाहीत. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर अप्रत्यक्षरित्या टीका केली.

आमच्यातल्या काही करंट्या लोकांना वाटतं की मुंबई महापालिकेचं काम चागलं नाही. दुसरी कोणती महानगरपालिका असती तर टीकलीच नसती, अशी कोपरखळी उद्धव यांनी यावेळी मारली.