संशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे : शरद पवार

मुस्लिम संघटनांनी आधीच इसिसचा निषेध केला आहे. मात्र, संशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे आहे, अटक केली तर २४ तासात त्यांना कोर्टात हजर करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.

Updated: Aug 30, 2016, 03:19 PM IST
 संशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे : शरद पवार title=

मुंबई : मुस्लिम संघटनांनी आधीच इसिसचा निषेध केला आहे. मात्र, संशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे आहे, अटक केली तर २४ तासात त्यांना कोर्टात हजर करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.

अॅट्रोसिटीचा गैरवापर नको ही आमची भूमिका आहे, असे सांगत आर्थिकदृष्टया मागास लोकांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, असे शरद पवार म्हणालेत. अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर दलितांकडून नव्हे, स्थानिक नेतृत्वाकडून होतोय. त्यामुळे अॅट्रोसिटीचा गैरवापर होऊ नये यावर प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे. तीच आमची भूमिका आहे. दरम्यान, अॅट्रोसिटी कायदा पूर्णपणे रद्द करा, अशी आमची भूमिका नाही, अशी सारवासारव पवार यांनी यावेळी केली. 
 
राज्यात मराठा समाजाचे जे मोर्चे निघत आहेत ते योग्य आहेत, सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे. ओबीसी आरक्षणला धक्का न लावता आर्थिकदृष्टया मागास मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे पवार यांनी सांगितले.