मराठी अधिकाऱ्यांमुळे परप्रांतीयांचे फावलेय : राज ठाकरे

आपलेच मराठी शासकीय अधिकारी या परप्रांतीयांना खोटे परवाने देतात, मग हेच लोक आपल्या उरावर बसतात, असे प्रतिपादन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता मेळाळ्यात केले.

Updated: Aug 30, 2016, 01:21 PM IST
मराठी अधिकाऱ्यांमुळे परप्रांतीयांचे फावलेय : राज ठाकरे title=

मुंबई : आपलेच मराठी शासकीय अधिकारी या परप्रांतीयांना खोटे परवाने देतात, मग हेच लोक आपल्या उरावर बसतात, असे प्रतिपादन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता मेळाळ्यात केले.

आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्याला हात घातला आहे. महाराष्ट्रातला मराठीचे वर्चस्व संपवण्याचा कट सुरु आहे आणि याला आतून बाहेरून मदत करणारे आपलेच आहेत. कुंपणच शेत खातंय, असे राज ठाकरे यावेळी म्हणालेत.

आपली सत्ता रस्त्यावर!

निवडणुकीतील यश-अपयशाची मला चिंता नाही. माझ्या पक्षाचे किती आमदार निवडणूक येतात, याने मला काही फरक पडत नाही. माझी सत्ती ही रस्त्यावर चालते, असा टोला विरोधकांना राज ठाकरेंनी लगावला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी बलात्कार मुद्द्यावर भाष्य केले. बलात्कार रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरच आहे. तरच बलात्कारासारख्या घटना थांबणार नाहीत. तसेच कोपर्डी भेटीच्या वेळी गावकऱ्यांनी अॅट्रॉसिटीच्या दुरुपयोगाच्या तक्रारी केल्या, या दुरुपयोगामुळेच या कायद्यात बदल झाला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणालेत.

झी २४ तास LIVE अपडेट

12:32 PM
मुंबई : महाराष्ट्रातला मराठीचं वर्चस्व संपवण्याचा कट सुरु आहे आणि याला आतून बाहेरून मदत करणारे आपलेच, कुंपणच शेत खातंय - राज ठाकरे
12:32 PM
मुंबई : काल कल्याणमधल्या पक्षाच्या आंदोलनाच्या वेळी एक उत्तर भारतीय म्हणते की आमच्यामुळे ही मुंबई उभी आहे, असे बोलायची यांची हिंमत होतेच कशी? - राज ठाकरे
12:28 PM
मुंबई : आपलेच मराठी शासकीय अधिकारी या परप्रांतीयांना खोटे परवाने देतात, मग हेच लोक आपल्या उरावर बसतात - राज ठाकरे
12:26 PM
मुंबई :दहीहंडीला जे घाणेरडं स्वरूप आले, त्या नावाखाली धांगडधिंगा होतो त्याला लोक कंटाळले म्हणून लोक विरोधात बोलायला लागलेत - राज ठाकरे
12:22 PM
मुंबई : निवडणुका लढवा पण त्यापेक्षा जास्त लक्ष लोकांच्या समस्यांकडे द्या, प्रभागातले छोटे प्रश्न सोडवा - राज
12:19 PM
मुंबई : आमदार किती निवडून आलेत याची चिंता मला नाही, माझी सत्ता रस्त्यावर - राज ठाकरे
12:18 PM
मुंबई : शहरांत फेरीवाल्यांचा उच्छाद वाढलाय, त्यांनी फुटपाथ व्यापून टाकलेत पण या विषयांवर माध्यम गप्प का? दहीहंडीवर तावातावाने लिहायला माध्यमं पुढे - राज ठाकरे
12:17 PM
मुंबई : ट्रॅफिकचे नियम मोडले तर भरावा लागणार दंड जर वाढवायचा असेल तर केंद्रातून परवानगी लागते. राज्यांना इतके साधे अधिकार नसतील तर कसं राज्य चालणार - राज
12:16 PM
मुंबई : बलात्कारासारख्या घटना थांबवायला कठोर कायदा आल्याशिवाय या अशा घटना थांबणार नाहीत - राज
12:14 PM
मुंबई :पोलिसाला मुस्लिम तरुणांनी रॉडने बेदम मारले पण कोणीही काही बोलायला तयार नाही, मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे मग ते का नाही गेले - राज 
12:12 PM
मुंबई : गैरवापर होत असल्यास अॅट्रॉसिटी कायदा रद्द करुन दुसरा कायदा आणावा - राज ठाकरे
12:10 PM
मुंबई :माझ्यावर कितीही टीका करा, महाराष्ट्राच्या हिताचे जे असेल ते मी बोलत राहणार - राज ठाकरे
12:09 PM
मुंबई :अॅट्रॉसिटीविषयी सर्वप्रथम मी बोललो काल शरद पवार बोलले, पण टीका माझ्यावरच झाली - राज  
12:07 PM
मुंबई : माझ्यावर कितीही टीका करा, महाराष्ट्राच्या हिताचं जे असेल ते मी बोलत राहणार - राज ठाकरे 
12:07 PM
मुंबई :जातीनिहाय धर्मनिहाय कायदे हवेत कशाला? जातीच्या आधारावर आरक्षण का? ते आर्थिकदृष्टया असायला हवे - राज ठाकरे
12:06 PM
मुंबई :कोपर्डी भेटीच्या वेळी गावकऱ्यांनी अॅट्रॉसिटीच्या दुरुपयोगाच्या तक्रारी केल्या, या दुरुपयोगामुळेच या कायद्यात बदल झाला पाहिजे - राज ठाकरे