www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी मुंबईतल्या वीज दराच्या कपातीच्या मुद्यावर सुरु असलेलं उपोषण अखेर मागे घेतलंय. मुख्यमंत्र्यांनी वीज दर कपातीबाबत आश्वासन दिल्यानंतर निरुपम यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय.
मात्र मुख्यमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा निरुपम यांनी दिलाय. निरुपम गेल्या ४ दिवसांपासून मुंबईत वीज दर कपातीच्या मागणीसाठी उपोषणला बसले होते. रिलायन्स आणि टाटाचे अकाऊंट तपासण्याबाबत अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
यावेळी काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी खा.निरुपम यांना त्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री सकारात्मक पावलं उचलतील असं आश्वासन दिलं. त्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास खासदार संजय निरुपम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.
दरम्यान सायंकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत मुंबईतील वीज दरकपातसंदर्भात कुठलंही ठोस असं आश्वासन दिलं नाही. तसंच गरज असेल तर कंपन्याचं सोशल ऑडिट केलं जाईल आणि रिलायन्सची चर्चा करू अशा शब्दात त्यांनी अस्पष्ट शब्दात निरुपम यांच्या मागण्यांचा उल्लेख केला. त्यामुळं खा. संजय निरुपम यांनी मोठ्या घाईत सुरू केलं वीज दरविरोधी आंदोलन त्याच घाईनं त्यांनी मागे घ्यावं लागलं आहे. पण उपोषण सोडतांनाच आपल्या मागण्या मान्य न झाल्याच पुन्हा उपोषणावर बसण्याची घोषणा निरुपम यांनी केली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.