मानवी बाँबच्या आरोपावरून सनातनचा श्याम मानवांवर घणाघाती आरोप

सनातन संस्थेने पत्रकार परिषदेत श्याम मानव यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. संमोहनाच्या माध्यमातून कुणाकडूनही गैरकृत्य करून घेता येत नाही ही वस्तुस्थिती आहे, मात्र श्याम मानव सनातन संस्थेला बदनाम करत असल्याचा आरोप संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे.

Updated: Sep 29, 2015, 11:32 PM IST
मानवी बाँबच्या आरोपावरून सनातनचा श्याम मानवांवर घणाघाती आरोप title=

मुंबई : सनातन संस्थेने पत्रकार परिषदेत श्याम मानव यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. संमोहनाच्या माध्यमातून कुणाकडूनही गैरकृत्य करून घेता येत नाही ही वस्तुस्थिती आहे, मात्र श्याम मानव सनातन संस्थेला बदनाम करत असल्याचा आरोप संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे.

श्याम मानव यांनी आमच्या साधकांकडून गैरकृत्ये करून दाखवावीत अन्यथा आमची लेखी माफी मागावी, अशी मागणी वर्तक यांनी केली आहे. सनातन संस्थेच्या साधकांना संमोहीत करून त्यांच्याकडून गुन्हे घडवून घेतल्यानंतर त्यांच्या मेंदूतून संबंधित माहिती पुसून टाकण्यात येते, असा मानव यांचा आरोप आहे, ही सरळ सरळ संस्थेची बदनामी असल्याचं वर्तक यांनी म्हटलं आहे.

श्याम मानव यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सनातन संस्था संमोहनाच्या माध्यमातून मानवी बाँब बनवते असा खळबळजनक आरोप केला होता, या आरोपाला सनातन संस्थेने उत्तर दिलं आहे.

श्याम मानव हे स्वत: संमोहनाचे प्रशिक्षण देतात आणि ते यातले जाणकार मानले जातात. मात्र, त्यांनी सनातन संस्थेवर केलेल्या आरोपांमुळे संस्था त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल का याची चाचपणी करत आहे.

मानव हे सनातन संस्थेमध्ये होते, त्यामुळे त्यांना आतली माहिती असल्याचं सांगण्यात येत आहे, तरी यात काहीही तथ्य नसल्याचं आणि हिंदू धर्म मानत नसलेले मानव सनातनचे इनसायडर कसे असतील?, असा सवाल वर्तक यांनी केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.