'सामना'चं वादग्रस्त व्यंगचित्र; मराठा समाजाचं आंदोलन

सामना वर्तमानपत्रात मराठा समाजाच्या मूक मोर्चाबाबत छापून आलेल्या व्यंगचित्राचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटले. मीरा-भायंदरमधल्या मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी व्यंगचित्रकार श्रींनिवास प्रभुदेसाई यांच्या विलेपार्ले येथील घराबाहेर आंदोलन केले. 

Updated: Sep 26, 2016, 11:01 PM IST
'सामना'चं वादग्रस्त व्यंगचित्र; मराठा समाजाचं आंदोलन title=

मुंबई : सामना वर्तमानपत्रात मराठा समाजाच्या मूक मोर्चाबाबत छापून आलेल्या व्यंगचित्राचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटले. मीरा-भायंदरमधल्या मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी व्यंगचित्रकार श्रींनिवास प्रभुदेसाई यांच्या विलेपार्ले येथील घराबाहेर आंदोलन केले. 

दरवाजावर शाई फेकली आणि त्यांच्या बिल्डिंगखाली सामना वृत्तपत्राचे अंक जाळले. तर नाशिकमध्येही सिडकोच्या त्रिमूर्ती चौकात सामनाच्या अंकाची होळी करण्यात आली. 

जिल्ह्यात सर्वत्र याबाबत संताप व्यक्त करण्यात येत असून ठिकठिकाणी होळी करण्यात येतेय. पोलीस आयुक्तांना याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या महिला संघटनेनं निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. 

तर जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनंही या व्यंगचित्राचा निषेध व्यक्त करत  वृत्तपत्राची होळी केली. आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आजी-माजी आमदार, खासदार सहभागी झाले होते. 

परभणी आणि जालन्यातही याचे पडसाद उमटले.  तर राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांनीही सामना आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय.