सैराटची टीम मातोश्रीवर... उद्धव ठाकरेंनी दिली एक अनोखी 'भेट'

 सैराट मध्ये काम केलेल्या मुलांचं यश अवाक करणार आहे.  या सगळ्यांची कारकीर्द अशीच बहरत राहू द्या आणि उत्तरोत्तर याच्याहून अधिकाधिक यश मिळू देवो अशा शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सैराटच्या टीमला दिल्या आहे. 

Updated: May 19, 2016, 03:47 PM IST
 सैराटची टीम मातोश्रीवर... उद्धव ठाकरेंनी दिली एक अनोखी 'भेट' title=

मुंबई :  सैराट मध्ये काम केलेल्या मुलांचं यश अवाक करणार आहे.  या सगळ्यांची कारकीर्द अशीच बहरत राहू द्या आणि उत्तरोत्तर याच्याहून अधिकाधिक यश मिळू देवो अशा शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सैराटच्या टीमला दिल्या आहे. 

सैराट च्या टीम ने घेतली मातोश्री वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट  घेतली त्यावेळी ते बोलत होते.  सैराटच्या टीमचं उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं आणि उद्धव ठाकरे यांनी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्यासह सर्व टीमला सिद्धिविनायकाची मूर्ती भेट म्हणून दिली. 


टीम 'सैराट' मातोश्रीवर

प्रादेशिक पक्ष निवडणुकीत 'सैराट'

- 5 राज्याच्या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होतं कि जिथे जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत तिथे तिथे जनता त्या पक्षांना पसंती देते हे चांगले लक्षण आहे.

प्रादेशिक पक्षांवर जबाबदारी

- प्रादेशिक पक्षांची जबाबदारी उद्याच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये फार मोठी राहणार आहे आणि सर्व राजकीय पक्ष त्या जबाबदारीने वागतील याची मला अशा आहे

बांगलादेशातून घुसखोरी थांबेल...

- आसाममध्ये बीजेपीचं सरकार आलेलं आहे. आता आसामधली घुसखोरी कठोरपणाने थांबेल अशी अपेक्षा आहे.