दादर-पुणे शिवनेरी प्रवास 10 रूपयाने महागणार

१ जून पूर्वी आरक्षण केलेल्या आणि १ जून अथवा त्यानंतर प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांकडून प्रवासाच्या दरम्यान हा फरक वसूल केला जाणार आहे.

Updated: May 31, 2014, 11:17 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एसटीने जाहीर केलेली प्रवासी भाडेवाढीची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार आहे.
ही वाढ 2.48 टक्के आहे.
एसटीच्या नवीन भाडेवाढीनुसार दादर-पुणे शिवनेरी प्रवासासाठी आता प्रवाशांना 10 रूपये मोजावे लागणार आहेत.
साध्या आणि जलद सेवेच्या पहिल्या १२ किलोमीटरच्या प्रवासासाठी वाढ करण्यात आलेली नाही. १३ ते ४२ किलोमीटरसाठी एक रुपया आणि ४३ ते ५४ किलोमीटरच्या प्रवासासाठी दोन रुपये अशी अल्प वाढ करण्यात आली आहे.

१ जून पूर्वी आरक्षण केलेल्या आणि १ जून अथवा त्यानंतर प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांकडून प्रवासाच्या दरम्यान हा फरक वसूल केला जाणार आहे.
नव्या दरानुसार बोरिवली-स्वारगेट शिवनेरीच्या प्रवासासाठी ४६८ रुपयांऐवजी ४८२ रुपये तर ठाणे-स्वारगेट या शिवनेरीच्या प्रवासासाठी ४०५ रुपयांऐवजी ४१५ रुपये मोजावे लागतील.
बोरिवली-रत्नागिरी प्रवासासाठी साध्या जलद गाडीचे नवीन तिकिट सध्या ३८१ रुपये आहे. तेही दहा रुपयांनी महागले आहे. रात्रसेवेचा दर ४५० रुपयांवरून ४६३ रुपये झाला आहे. निमआराम (हिरकणी)चे तिकिट १५ रुपयांनी महागले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.