मुंबई : मेट्रो दरवाढीला प्रवाशांचा तीव्र विरोध असताना आता शिवसेनेनेही दरवाढीला विरोध केलाय. मेट्रोची दरवाढ मागे घ्या यासाठी शिवसेनेने फलक घेऊन आंदोलन केले.
गेल्याच आठवड्यात मेट्रो रेल्वेने मुंबईकरांच्या माथी मोठी भाडेवाढ लादली गेली. ४० रुपयांवरील भाडे थेट १४० रुपयांवर गेल्याने मुंबईकरांमध्ये या दरवाढीवरून मोठ्या प्रमाणावर असंतोष होता. ही असंतोष शिवसेनेने आपल्या आंदोलनातून दाखवून दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो रेल्वेच्या दरवाढीला ब्रेक लावला. मेट्रोच्या दरवाढीला राज्य सरकारची परवानगी नसून याबाबत विशेष लेखापरीक्षण करण्यात येईल आणि मेट्रोच्या विशेष लेखीपरीक्षण अहवालानंतरच सुधारित दर लागू करता येऊ शकतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्यातरी मेट्रोची भाववाढ रोखली गेली आहे.
तसेच लुईस बर्जरची चौकशी करणार, असल्याची माहिती करणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. भारतात कामे तसेच कंत्राटे मिळवण्यासाठी विविध उच्चपदस्थांना तसेच लोकप्रतिनिधींना मोठ्या प्रमाणावर लाच दिल्याची अमेरिकी न्यायालयात कबुली लुईस बर्जर यांनी दिली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध कामांची तसेच कंत्राटांची चौकशी अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्यामार्फत केली जाईल, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. लुईस बर्जर या कंपनीला मेट्रो वन, मोनो रेल, नवी मुंबईतील मेट्रोची विविध कामे, नवी मुंबई विमानतळ तसेच सांताक्रुझ-चेंबूर लिंक रस्ता आदी कामे देण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.