पालघरमध्ये सापडलेली स्फोटके आरडीएक्स

पालघरमध्ये सापडलेली स्फोटकं आरडीएक्सची आहेत. स्फोटकांमध्ये आरडीएक्स आणि जिलेटीन असल्याचं उघड झाले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळं मोठा घातपात टळला आहे.

Updated: Nov 3, 2016, 01:10 PM IST
पालघरमध्ये सापडलेली स्फोटके आरडीएक्स title=

मुंबई : पालघरमध्ये सापडलेली स्फोटकं आरडीएक्सची आहेत. स्फोटकांमध्ये आरडीएक्स आणि जिलेटीन असल्याचं उघड झाले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळं मोठा घातपात टळला आहे.

पालघरच्या सातवली गावात एटीएसनं जप्त केलेली स्फोटकं ही आरडीएक्स असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.  28 ऑक्टोबरला सातवली गावातून 15 किलो स्फोटकं एटीएसनं जप्त केली होती. 

या सगळ्या स्फोटकांची तपासणी केल्यानंतर ते आरडीएक्स, जिलेटीन आणि अमोनिअम नायर्टेट असल्याचं समोर आलंय. त्यामुळे हा मोठ्या घातपाताचा भाग होता का, याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. पालघरचा बराचसा भाग हा समुद्राला जोडलेला असल्यानं हा परिसर संवेदनशील समजला जातो.