सिद्धार्थ महाविद्यालयाचा पदभार आठवलेंकडे...

कॉलेजच्या संचालक मंडळाचा वाद चव्हाट्यावर आला... प्रचंड गोंधळ झाला... या गोंधळानंतर आता आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले आज अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारणार आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 5, 2012, 08:00 AM IST

www.24taas.com, मुंबई
फोर्टच्या सिद्धार्थ कॉलेजची स्थापना खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. मात्र, या कॉलेजच्या संचालक मंडळाचा वाद चव्हाट्यावर आला... प्रचंड गोंधळ झाला... या गोंधळानंतर आता आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले आज अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारणार आहेत.
मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजबाहेर जून महिन्यात झालेला गोंधळ पाहून हे एखादं राजकीय आंदोलन असल्याचं तुम्हाला भास होईल. मात्र, कॉलेजबाहेर सुरू असलेली ही लढाई होती ती या महाविद्यालयाच्या संचालक मंडळावर कोण जाणार याची... या गोंधळानंतर आता आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारणार आहेत. या संस्थेचे अध्यक्ष प्रितमकुमार शेगावकर यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झालं होतं.
फोर्टच्या सिद्धार्थ कॉलेजची स्थापना खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलीय. प्रकाश आंबेडकर यांच्या रुपानं इतिहासात प्रथमच बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यातील व्यक्तीची संचालक पदावर निवड झाली. मात्र, ११ पैकी ९ सदस्यांचा त्यांना विरोध होता. बाबासाहेबांचे नातू आणि भारिप नेते प्रकाश आंबेडकर संचालक मंडळाचा पदभार स्विकारण्यासाठी पोहचले आणि प्रचंड गोंधळ झाला. याबाबत विचारलं असतं प्रकाश आंडेकरांनी काही बोलण्यास नकार दिला होता. आता अध्यक्षपदाचा भार बुधवारी रामदास आठवले स्विकारणार आहेत. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेल्या कॉलेजमध्ये पदासाठी सुरु असलेली लढाई म्हणजे दुर्देव म्हणावं लागेल.