मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आज राजन वेळुकरांनी कुलगुरुपदाचा पदभार स्विकारला.
राज्यपालांनी सूचना केल्यानंतर राजन वेळुकरांची कुलगुरुपदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने वेळुकरांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर आज अखेर त्यांनी आपल्या पदाचा पदभार पुन्हा सांभाळलाय.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळूकर हे कुलगुरूपदासाठी पात्र नसल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवला होता. त्याचवेळी निवड समितीने वेळूकर यांची या पदावर चुकीच्या पद्धतीने निवड केल्याचे ताशेरेही न्यायालयाने ओढले होते. त्यानंतर वेळूकर यांना हटविण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.