'मुंबईतल्या मिठागरांच्या जागेवर सामान्यांना घरं उपलब्ध करून देणार'

मुंबईतल्या मिठागरांची जागा विकासासाठी वापरता यावी, याकरता राज्य सरकारनं केंद्राला पत्र लिहून विनंती केलीय. 

Updated: Mar 7, 2015, 09:22 AM IST
'मुंबईतल्या मिठागरांच्या जागेवर सामान्यांना घरं उपलब्ध करून देणार'  title=

मुंबई : मुंबईतल्या मिठागरांची जागा विकासासाठी वापरता यावी, याकरता राज्य सरकारनं केंद्राला पत्र लिहून विनंती केलीय. 

मुंबईत भांडुप, विक्रोळी जवळच्या खाडी भागांत, पूर्व द्रुतगती मार्गाच्या बाजूला साधारण तीन हजार एकर मिठागरांची जमीन आहे.

पर्यावरणाचं महत्त्व लक्षात घेता 'सीआरझेड' नियमांतर्गत मिठागरांची जागा संरक्षित करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच मोकळ्या जागेची कमतरता असलेल्या मुंबईत एवढी मोठी जागा विकासासाठी उपलब्ध झाल्यास, अनेक प्रकल्प राज्य सरकारला राबवता येतील. 

मुख्य म्हणजे, परवडणारी ११ लाख घरं मुंबईत उपलब्ध करून देण्याबाबतचा आराखडा राज्य सरकार तयार करतंय. त्यामुळे, मिठागरांची जागा उपलब्ध झाल्यास जास्त जास्त एफएसआय देत, मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध होऊ शकतील,  असंही राज्य सरकारनं म्हटलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.