मुंबई : मनेसेची बहुचर्चित महाराष्ट्राच्या विकासाची 'ब्लू प्रिंट'आज गुरुवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी पाच वाजता प्रकाशित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या विकासात सर्वांची साथ हवी, अशी साद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घातली आहे. निवडणुकीच्या रणसंग्रामात मनसे घेणार उडी.
मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेलेले राज ठाकरे यांनी आपला दौरा आजाराचे कारण देऊन अर्धवट सोडला. त्यानंतर त्यांनी गप्पच राहणे पसंत केले आहे. काँग्रेस पक्ष वगळता अन्य राजकीय पक्षांप्रमाणेच अजूनही उमेदवार जाहीर न केल्यामुळे मनसे उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेला अपेक्ष काम करता आलेले नाही. त्यामुळे आता उमेदवारी कोणाला मिळते, याकडे लक्ष लागले आहे. आज राज ठाकरे 'ब्लू प्रिंट' प्रकाशित करणार असल्याने लक्ष आहे. शिवाय यावेळी उमेदवार यादी जाहीर करणार का, याचीच चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेच्या दहाही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्यानंतर राज ठाकरे पक्षबांधणीकडे लक्ष देऊन महाराष्ट्राचा दौरा करतील अशी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची अपेक्षा होती. तथापि औरंगाबादचा दौरा वगळता राज ठारे कृष्णकुंजमधून बाहेर पडलेले नाहीत.
'ब्लू प्रिंट' प्रसिद्ध करण्यास झालेला उशीर तसेच शेवटपर्यंत उमेदवार जाहीर करण्यास होत असलेल्या उशीरामुळे निवडणुकीला सामोर जायचे कसे, अशी चर्चा मनसेच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात ऐकायला मिळते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.