नवरात्रौत्सव: फुलांचे भाव वाढले, बाजारपेठा गर्दीनं फुलल्या

नवरात्रीत फुलांचं मुख्य आकर्षण असल्यानं सगळ्या बाजारपेठा सध्या झेंडू, शेवंती, अस्टर, निशीगंध अशा विविध फुलांनी बहरल्या आहेत. पावसाळा लांबल्याचं निमित्त सांगून विक्रेत्यांनी या वर्षीही फुलांच्या किमतीत वाढ केल्याचं दिसतंय. 

Updated: Sep 25, 2014, 07:59 AM IST
नवरात्रौत्सव: फुलांचे भाव वाढले, बाजारपेठा गर्दीनं फुलल्या   title=

मुंबई: नवरात्रीत फुलांचं मुख्य आकर्षण असल्यानं सगळ्या बाजारपेठा सध्या झेंडू, शेवंती, अस्टर, निशीगंध अशा विविध फुलांनी बहरल्या आहेत. पावसाळा लांबल्याचं निमित्त सांगून विक्रेत्यांनी या वर्षीही फुलांच्या किमतीत वाढ केल्याचं दिसतंय. 

बाजारात शेवंती, अस्टर सध्या २४० ते २८० रुपये किलो दराने विक्रीला उपलब्ध असून, उपनगरांमध्ये २५० ते ३०० रुपये किलो दराने फुले विकली जात आहेत.

तर झेंडू, शेवंती, अस्टर अशी रंगीबेरंगी फुले आणि पूजा साहित्यानं सजलेल्या बाजारपेठा फुलल्या आहेत. महिलांनी गुरुवारी सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. घटस्थापनेच्या पूजेच्या तयारीसाठी त्यांनी काळी माती, टोपली, पंचकडधान्य, मंडपी अशा साहित्याची खरेदी केली. मंडई, मार्केट यार्डसह कोथरूड, डेक्कन, कर्वे रोडवरील बाजारपेठांमध्येही महिलांची रात्री उशीरापर्यंत लगबग सुरु होती.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.