मुंबई-उपनगरात पहाटेपासून दमदार पाऊस

पावसाचा पहिला वीकेंडला चिंब झालाय. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरात दमदार पाऊस सुरु आहे. दिवसभर मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे. दरम्यान, मुंबईत तूर्तास पाणीकपात होणार नाही, असे सांगण्यात आलंय. त्यामुळे पावसाने मुंबईकरांना दिलासा दिलाय.

Updated: Jun 13, 2015, 09:18 AM IST
मुंबई-उपनगरात पहाटेपासून दमदार पाऊस title=

मुंबई : पावसाचा पहिला वीकेंडला चिंब झालाय. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरात दमदार पाऊस सुरु आहे. दिवसभर मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे. दरम्यान, मुंबईत तूर्तास पाणीकपात होणार नाही, असे सांगण्यात आलंय. त्यामुळे पावसाने मुंबईकरांना दिलासा दिलाय.

वीकेंडला मुंबईत पावसाची धुवाधार सुरु आहे. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत उपनगरात सर्वच भागात मुसळधार पाऊस सुरु आहे.

मुंबईत सकाळी सातपर्यंत २६.२ मिमी पावसाची नोंद झालीय.. पूर्व उपनगरात २९.३७ मिमी तर पश्चिम उपनगरात २२ मिमी पावसाची नोंद झालीय. मुंबई आणि उपनगरात दिवसभर मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.