रविवारी रेल्वेने पुण्याला जाणार असेल तर थांबा

रविवारी पुण्याला जाण्याचा बेत आखत असाल तर जरा थांबा. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक महाब्लॉकमुळे बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी बसशिवाय दुसरा पर्याय नाही.

Updated: Jan 9, 2016, 11:16 PM IST
रविवारी रेल्वेने पुण्याला जाणार असेल तर थांबा title=

मुंबई : रविवारी पुण्याला जाण्याचा बेत आखत असाल तर जरा थांबा. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक महाब्लॉकमुळे बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी बसशिवाय दुसरा पर्याय नाही.

एसटी महामंडळांनी ही गोष्ट लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी सुमारे २०० जादा गाड्या सोडणार आहेत. भायखळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनसदरम्यानचा हँकॉक पूल पाडण्याचे काम उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे तब्बल १८ तास महाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुण्याला जाणार्‍या ४२ लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.