राहुल गांधींना भिवंडी कोर्टाकडून जामीन मंजूर

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना भिवंडी न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. 

Updated: Nov 16, 2016, 11:18 AM IST
राहुल गांधींना भिवंडी कोर्टाकडून जामीन मंजूर  title=

भिवंडी : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना भिवंडी न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. 

६ मार्च २०१४ साली खासदार निवडणूक प्रचाराच्या वेळी भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातील सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येसंबंधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. या टीकेनंतर भिवंडी शहराचे कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टात राहुल गांधींविरोधात याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीसाठी राहुल गांधी आज भिवंडीत दाखल झाले. 

या याचिकेनिमित्त राहुल गांधी एका तारखेस भिवंडी कोर्टात आले. त्यानंतर दिल्ली सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या अशा प्रकारच्या इतर याचिकांसोबत त्यांची सुनावणी झाली. मात्र, या याचिकेतील मुद्दे आणि आरोपांमुळे ही याचिका पुन्हा भिवंडी कोर्टात सुनावणीसाठी पोहोचली होती.

आज या प्रकरणी भिवंडी कोर्टात सुनावणी पार पडली. राहुल गांधींच्या वकिलांनी भिवंडी कोर्टाकडून जामीन मागू मागितला... कोर्टानंही हा जामीन मंजूर केलाय.