मुंबई : देशात आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे. उद्यापर्यंत थांबा निर्णय कळेल, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करणे हा राजकीय विषय नसून, सव्वाशे कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला.
नागरिकांजवळील नोटा 30 डिसेंबरपर्यंत बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये बदलून मिळणार आहेत. या निर्णयामुळे देशभरात बँकांबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याविषयी संजय राऊत यांनी मत व्यक्त केले आहे.
संजय राऊत म्हणाले, की महाराष्ट्रात काय चाललंय हे आम्ही पाहत आहे. यावर शिवसेनेला हातावर हात ठेवून बसता येणार नाही. या प्रश्नावर सर्वांचे दरवाजे ठोठावून जर जनतेला न्याय मिळणार असेल तर त्यासाठी शिवसेनेची तयारी आहे, याबाबत उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली आहे.