मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २२ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे, तसेच १९ कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे.
या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागातील हा मोठा घोटाळा असल्याचं पुढे येत आहे.
मुंबईतील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंधेरी विभागाअंतर्गत करण्यात आलेल्या कामामध्ये अधिकारी आणि कंत्राटदारांनी कोटयवधी रुपयांच्या बिलांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
उत्तर मुंबई विभागातील हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अन्य विभागातील देयकांची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले असून यातून आणखी मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.