मुंबई : कृपाशंकर सिंह यांच्या अडचणीत वाढ झालीय. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कोर्टाने ताशेरे ओढलेत. कृपाशंकर सिंह यांच्यावर दाखल असलेले गुन्हे, आरोप आणि तपास लक्षात घेता हे प्रकरण मनी लाँड्रिंग अॅक्ट प्रकरणात मोडत असल्याचं कोर्टाने निदर्शास आणलं. त्यामुळे याप्रकरणी इडीचं काय म्हणणं आहे अशी विचारणा कोर्टाने इडीला दिली.
तर दुसरीकडे आयकर विभागालाही कोर्टाने खडे बोल सुनावलेत. कृपाशंकर सिंह यांच्या चार पॅनकार्ड असल्याची माहिती तक्रारदाराने दिली होती. त्यासंदर्भात आयकर विभागाने कोर्टात अहवाल सादर केला. त्यासंदर्भात चारपैकी दोन पॅनकार्ड चुकीचे असून एक पॅनकार्ड रद्द झाल्याची माहिती आयकर विभागाने कोर्टात दिली. यावर कोर्टाने आश्चर्य व्यक्त एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असणं गुन्हा नाही का असा प्रश्न उपस्थित केला.