धारावीमध्ये धर्मगुरू करताय मतदानाच्या हक्काबाबत प्रचार

निवडणुका जवळ आल्या की नेते प्रचार करताना दिसतात. पण मुंबईतल्या धारावीत तुम्हाला सर्व धर्मांचे धर्मगुरू प्रचार करताना दिसतील. पण हे धर्मगुरू धर्माचा नाही तर मतदानाच्या हक्काबाबत प्रचार करत आहेत. त्यासाठी एखाद्या नेत्याला लाजवेल असा प्रत्येक फंडा हे धर्मगुरू वापरत आहेत.

Updated: Jan 23, 2017, 08:04 PM IST
धारावीमध्ये धर्मगुरू करताय मतदानाच्या हक्काबाबत प्रचार  title=

मुंबई : निवडणुका जवळ आल्या की नेते प्रचार करताना दिसतात. पण मुंबईतल्या धारावीत तुम्हाला सर्व धर्मांचे धर्मगुरू प्रचार करताना दिसतील. पण हे धर्मगुरू धर्माचा नाही तर मतदानाच्या हक्काबाबत प्रचार करत आहेत. त्यासाठी एखाद्या नेत्याला लाजवेल असा प्रत्येक फंडा हे धर्मगुरू वापरत आहेत.

मतदानाचं महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी मुंबईत कॅम्पेन सुरू करण्यात आलं आहे. धारावीमध्ये सर्व धर्मगुरू मतदानाचं महत्त्व लोकांना समजत आहेत. पंडीत,  मौलवी, पादरींनी हा विडा उचलला आहे. मतदानाची आकडेवारी वाढायलाच हवी याकडे हे सर्व धर्मगुरू जातीनं लक्ष देताना दिसत आहेत. एखाद्या उमेदवारासारखं हे धर्मगुरू प्रत्येक घराघरात झोपडीत जाऊन मतदानाच्या अधिकाराबाबत जागरुकता निर्माण करत आहेत.

मतदानाची आकडेवारी वाढावी यासाठी सर्व योग्य त्या उपायोजना हे धर्मगुरू करताना दिसत आहेत. मतदान हा सर्वात मोठा धर्म,  हेच हे सर्व धर्मगुरू सांगत आहेत. येवढंच नाही तर याबाबत कुणाच्या काही समस्या असतील तर त्याचंही निराकरण ते करत आहेत.

धर्मगुरूंच्या या अवेअरनेस कॅम्पेनचा फायदा होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. धर्मगुरूंनी उचललेलं हे कौतुकास्पद पाऊल समाजातही निश्चितच सकारात्मक बदल घडवताना दिसेल आणि यावेळी विक्रमी मतदान होईल अशी अपेक्षा करता येईल.

पाहा व्हिडिओ