खासगी रुग्णालयांना चेक स्वीकारावेत-सीएम

रुग्णांवरच्या तातडीच्या उपचारांसाठी राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांनी चेक स्वीकारण्याचे सक्त आदेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिले आहेत. 

Updated: Nov 14, 2016, 06:12 PM IST
खासगी रुग्णालयांना चेक स्वीकारावेत-सीएम title=

मुंबई : रुग्णांवरच्या तातडीच्या उपचारांसाठी राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांनी चेक स्वीकारण्याचे सक्त आदेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिले आहेत. 

जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याकरता राज्याचं आरोग्य विभाग चोवीस तास परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

खासगी रुग्णालयांनी हा आदेश धुडकावल्यास 108 या सरकारी हेल्पलाईन नंबरवर तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय.