मालेगाव बॉम्बस्फोट : कर्नल पुरोहितला जामीन मिळणार?

२००८ मध्ये मालेगावात झालेल्या स्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी आहे.

Updated: Sep 22, 2016, 10:54 AM IST
मालेगाव बॉम्बस्फोट : कर्नल पुरोहितला जामीन मिळणार? title=

मुंबई : २००८ मध्ये मालेगावात झालेल्या स्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी आहे.

हा खटला विशेष न्यायालयात विशेष न्यायाधिशांसमोर चालवण्यात येईल, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं. पुरेसा पुरावा नसल्यामुळे आरोपींवर मोक्का लावता येणार नाही, असंही सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केलं होतं.

त्याआधारे याआधी या खटल्यातले चार जण सुटले आहेत. आता कर्नल पुरोहितना आज जामीन मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.