मुंबई : विषारी दारूकांडाचा सुत्रधार आतिक हा मोठा दारू तस्कर असून त्याचं देशभरात विषारी दारू तस्करीचं जाळं पसरलंय. आतिकच्या अटकेने अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या आशीर्वादानेच आतिक आणि त्याच्या सहा साथीदारांनी विषारी दारूचं जाळं देशभर पसरवलं होतं.
मालवणीत विषारी दारूचे १०२ बळी घेणाऱ्या आतिकला ३ जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. आतिक हा मुंबईपुरता नाही तर देशभरातला मोठा दारू तस्कर... गुजरात, राजस्थान इथूनही तो दारूची तस्करी करायचा.
गुजरातमध्ये संपूर्णतः दारूबंदी आहे. त्यामुळे दारू तस्कर आतिकच्या सहाय्याने मुंबई, राजस्थान, कलकत्ता आणि देशभर विषारी दारूची तस्करी करायचा. गुजरात, राजस्थान महाराष्ट्रातले केमिकल माफिया आणि केमिकल कंपन्याही यात सामील असल्याचं बोललं जातंय. एवढच नाही तर १०२ बळी ज्या दारूने घेतले ती दारू अजूनही लपवली असल्याचा पोलिसांना संशय आहे.
देशभरात दारूची तस्करी आतिक करायचा ती एका राजकीय नेत्याच्या आशिर्वादाने अशी सुत्रांची माहिती आहे. ती राजकीय व्यक्ती कोण याचा खुलासा लवकरच केला जाईल असं पोलीस सूत्रांकडून कळतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.