मुंबई : नव्या दरानुसार मुंबईत रिक्षाचं किमान भाडं १७ रुपयांऐवजी आता १८ रुपये होणार आहे. तर टॅक्सीचं किमान भाडं २१ रुपयांवरुन २२ होणार आहे.
हकीम समितीच्या शिफारशीनुसार रीक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ लागू करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यानुसार आता रिकॅलिब्रेशन झालेल्या रीक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ उद्यापासूनच अंमलात येणार आहे.
हकीम समितीच्या प्रस्तावित भाडेवाढीला विरोध करणारी याचिका मुंबई ग्राहक मंचानं उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका फेटाळून लावताना, न्यायालयानं हा आदेश दिला.
येत्या २५ जूनपासून मीटर्सचं रिकॅलिब्रेशन सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरीत रिक्षा- टॅक्सींचं रिकॅलिब्रेशन लवकर होण्याकरता राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभारण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.