मुंबई : राज्यातील पोलीस भरतीतील उमेदवारांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे.
पोलीस भरतीची वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी आता २५ वरून २८ वर्षे एवढी वाढवण्यात आली आहे तर मागासवर्गीयांसाठी ३० ऐवजी ३३ एवढी करण्यात आली आहे.
पोलीस शिपाई भरतीबाबत सुधारित मसुदा जाहीर करताना खुल्या आणि मागासवर्गीयांसाठी वाढलेल्या वयोमर्यादेबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी आज आदेश जारी केले आहेत.
पोलीस भरती आधीच सुरू झाली आहे, मात्र ज्यांनी यापूर्वीच ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत त्यांनी पुन्हा नव्याने अर्ज दाखल करण्याची गरज नसल्याचेही आदेशात म्हटले आहे.