मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी तंबाखू सेवनाबाबत कडक कायदा करण्याबाबत सूतोवाच केले आहे. आर.आर.पाटील यांच्या निधनानंतर राज्य सरकारने तंबाखू सेवनाबाबत कडक कायदा करण्याचे ठरवले असल्याचं सांगण्यात येत आहे.
अनेकदा जनजागृतीचे कार्यक्रम आणि जाहिरातींच्या माध्यमातून तंबाखू सेवनाचे दुष्पपरिणाम सांगण्याचे प्रयत्न केले. तरीही अपेक्षित परिणाम साधत नाही. त्यामुळे आता तंबाखू सेवन थांबवण्यासाठी कडक कायदा करण्याची गरज असल्याचे दीपक सावंत यांनी म्हटले आहे. शिवाय विधी आणि न्याय खात्याशी विचारविनिमय सुरु केल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
आर. आर. पाटील यांना तंबाखू सेवनामुळेच कर्करोगाचा सामना करावा लागला होता. त्यातच त्यांचं निधन झाले आणि राज्यातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर तंबाखू सेवनाबाबत कडक कायदा करण्याची भूमिका आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी घेतली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.