मुकेश अंबानींची ८ कोटींची बीएमडब्लू कार, १.६ कोटी रजिस्‍ट्रेशन शुल्क

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नवीन कार खरेदी केली आहे. या कारची किंमत ८ कोटी रुपये आहे. मात्र, या कारची रजिस्ट्रेशन फि १.६ कोटी रुपये इतकी मोजावी लागली.

Updated: May 19, 2015, 04:49 PM IST
मुकेश अंबानींची ८ कोटींची बीएमडब्लू कार, १.६ कोटी रजिस्‍ट्रेशन शुल्क title=

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नवीन कार खरेदी केली आहे. या कारची किंमत ८ कोटी रुपये आहे. मात्र, या कारची रजिस्ट्रेशन फि १.६ कोटी रुपये इतकी मोजावी लागली.

८ कोटी रुपयांची ही कार बुलेटप्रुफ आहे. ही कार जर्मनीत बनविण्यात आली आहे. मुंबईतील आरटीओ यांच्या माहितीनुसार आतापर्यंत सर्वात जास्त रजिस्ट्रेशन फि आहे. मुकेश अंबानी यांची नवी बीएमडब्लू ७ सिरीजमधील आहे. या कारमध्ये आत तसेच बाहेरुन सुरक्षेबाबत अनेक बदल करण्यात आले आहेत. मुकेश अंबानी यांची ही कार थेट परदेशातून आयात केली गेली आहे.

या कारची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. मात्र, अतिरिक्त फिचर्स आणि बदल यामुळे कारची किंमत वाढली. तसेच ३०० टक्के आयात शुल्क असल्याकारणाने या कारची किमत ८ कोटी रुपयांवर पोहोचली.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी ८ कोटी रुपये किमतीची बीएमडब्लू-७ सिरीजमधील ही कार गेल्या आठवड्यात मुंबईत दाखल झाली असून मुंबई आरटीओने २० टक्के रजिस्ट्रेशन शुल्क आकारले आहे. याची किंमत १.६ कोटी रुपयांच्या घरात जाते. जास्त रजिस्ट्रेशन शुल्क भरण्याचा रेकॉर्ड अंबानी यांच्या नावावर जमा झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.