भाजप सरकारचे पाकिस्तानी कलावंताना रेड कार्पेट : मनसे

पाकिस्तानी कलाकार अदनान सामीला पुन्हा भारतात राहण्याची केंद्र सरकारने परवानगी दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजप सरकार पाकिस्तानी कलावंताना रेड कार्पेट का घालत आहे ?

Updated: Aug 5, 2015, 04:29 PM IST
भाजप सरकारचे पाकिस्तानी कलावंताना रेड कार्पेट : मनसे title=

मुंबई : पाकिस्तानी कलाकार अदनान सामीला पुन्हा भारतात राहण्याची केंद्र सरकारने परवानगी दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजप सरकार पाकिस्तानी कलावंताना रेड कार्पेट का घालत आहे ?

 सामीला अमर्यात काळासाठी भारतात राहण्याची परवानगी दिल्यानंतर या विषयावर मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेय. आम्हाला भाजप सरकारची लाज वाटते. देशात पाकिस्तानकडून अतिरेकी कारवाया होत असताना बीजेपी सरकार पाकिस्तानी कलवंताना रेड कार्पेट का घालत आहे, असा सवाल मनसेने उपस्थित केलाय.

आम्ही पाकिस्तानी कलावंताना विरोध करायचा आणि पोलीस केसेस अंगावर घ्यायच्या आणि भाजपने त्यांना मात्र पोलीस संरक्षण द्यायचे. यापुढे जे  भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक पाकिस्तानी कलावंताना काम देतील, त्यांना भविष्यात कुठली अडचण आल्यास त्यांनी मनसेकड़े येऊ नये, त्यांना मनसेचे दरवाजे कायमचे बंद राहतील, असा इशारा मनसेने दिलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.