संपकरी कर्मचाऱ्यांच्या बोनसला स्थगिती

मुंबई महापालिकेच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या बोनसला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या संपकरी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार का, हे कोडं अजूनही सुटलेलं नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 25, 2012, 10:31 AM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिकेच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या बोनसला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या संपकरी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार का, हे कोडं अजूनही सुटलेलं नाही.
गेल्या महिन्यात न्या. अनुप मोहता यांच्या खंडपीठाने संपकऱ्यांना बोनस देण्याचे आदेश दिले होते. त्याविरुद्ध पालिकेने लेटर्स पेटन्ट अपील दाखल केले असून त्यावर मुख्य न्यायाधिश न्या. मोहित शहा आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात खंडपीठानं न्या. मोहता यांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिलीय.
यावर अंतिम सुनावणी १५ ऑक्टोबरला होणार असल्याचं स्पष्ट झालंय. तसेच या दरम्यान, पालिका आणि युनियनने या वादावर सामोपचारानं तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचनाही न्यायालयानं केली आहे.