मुंबई : राज्यात थंडीचा कडाका वाढलाय.. निफाडमध्ये पारा चांगलाच घसरला असून इथं 6 अंश से. तापमानाची नोंद झालीय..
अहमदनगरमध्येही कडाक्याची थंडी पडलीय.. नगरमध्ये 6.1 अंश से. तापमान नोंदवलं गेलंय.. तर परभणीत 6.5 अंश से. तापमान नोंदवण्यात आलंय..
दररोज घसरणाऱ्या थंडीच्या पाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादकांची झोप उडवत आहे. तर दुसरीकडे याच थंडीचा लाभ गहू,हरबरा व रब्बी कांदा पिकाला होत असल्याने हे शेतकरी सुखावल्याचे दिसून येतंय.