मुंबई : नीट परीक्षा रद्द करण्यासंदर्भातला अध्यादेश येत्या काही तासात तयार होण्याची शक्यताय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीट संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. याभेटीनंतर अध्यादेश काढण्यासंदर्भात स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
कुठल्याही परिस्थिती विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलीय.' नीट'मधून पुढची दोन वर्ष सीईटी वगळा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली.
पंतप्रधान मोदींशी फोनवरून झालेल्या संवादाचं विनाकारण राजकरण होत असल्याचं वक्तव्य आज राज ठाकरेंनी केलंय. मी नीट विषयासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोन वर संवाद साधला.
या संवादाला कुठलाही राजकीय पदर चढवू नये. नीट संदर्भात मी नरेंद्र मोदींसोबत फोनवर बोललो त्यानंतर नीट संदर्भात घडामोडी घडल्याचंही ते म्हणाले.