मुंबई : राष्ट्रवादीने जनतेच्या हितासाठी भाजप सरकारला पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी स्वत:च्या बचावासाठी पाठिंबा दिला आहे, अशी थेट टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली.
नारायण राणे यांनी पराभवनंतर मुंबईत घेतलेल्या पहिल्या पत्रकार पऱिषदेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. राष्ट्रवादीची निवडणुकीपूर्वीच भाजपबरोबर छुपी युती असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीने स्वत:साठी पाठिंबा जाहीर केलाय, असे राणे म्हणालेत.
यावेळी राणे यांनी भाजपच्या नवीन सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्य़े अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता नसल्याला टोला त्यांनी लगावलाय. तर उद्धव ठाकरे सत्तेसाठी लाचार झाल्याची खिल्ली राणेंनी उडवली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.