'महिनाअखेर पर्यंत शेतकऱ्यांना मदत'-मुख्यमंत्री

राज्यात १७ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱयांना मदत देण्यात येईल.

Updated: Mar 2, 2015, 01:52 PM IST
'महिनाअखेर पर्यंत शेतकऱ्यांना मदत'-मुख्यमंत्री title=

मुंबई : राज्यात १७ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱयांना मदत देण्यात येईल.

गेल्या काही वर्षात देण्यात आलेली मदत ही एका वर्षात द्यावी लागत आहे, तसेच केंद्राचे पॅकेज सात-आठ दिवसात आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

गारपीट आणि स्वाइन फ्लू बाबत आढावा घेतला आहे. यवतमाळमध्ये अभूतपूर्व पाऊस झाला आहे, 17,000 हेक्टरचे नुकसान झाले आहे . तातडीने पंचनामें करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील प्रभावित जिल्ह्यांची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडीओ कॉन्फ्रसिंगने घेतली. यावेळी स्वाईन फ्लूचा देखिल आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.