ww.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींचं नाव भाजपने जाहीर केलंय. त्यामुळे आता २०१४ च्या निवडणुकीसाठी मोदी विरूद्ध राहुल गांधी, अशी लढत होणार अशी शक्यता दिसत आहे. तशी वातावरणनिर्मिती सुरूही झालीय. त्यातच आता मुंबईत या दोघांवरही सट्टा लागला आहे.
सट्टा बाजारातल्या सुत्रांच्या मते मोदींना सर्वाधिक पसंती आहे. मुंबई, अहमदाबाद, जय़पूर, इंदूर, कराची आणि दुबई या शहरात आत्तापर्यंत जवळपास ९० कोटींचा सट्टा लागलाय. नरेंद्र मोदींवर एक रूपया ३० पैसे दर लागलाय. तर राहूल गांधींवर ३ रूपये दराचा सट्टा लागलाय. मनमोहन सिंग पंतप्रधानपदावर कायम राहणार का याला मात्र १२ रूपयांचा भाव मिळालाय. म्हणजेच ही शक्यता सट्टेबाजांना दुरापास्त दिसत आहे.
तर सोनिया गांधींना पंतप्रधानपद मिळणार का याला मात्र अगदीच कमी पसंती आहे. त्यावर १३ रूपयांचा भाव मिळालाय. लोकसभेत बहुमत भाजपला मिळणार असा सट्टेबाजांचा कयास आहे. काँग्रेसला बहुमतासाठी ५ रूपयांचा भाव मिळालाय. तर भाजपला मात्र दीड रूपयांचा भाव मिळाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
व्हिडिओ पाहा