नाराज राणेंची माणिकराव ठाकरेंनी काढली समजूत

उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री उशीरा राणेंची त्यांच्या जुहूच्या भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. 

Updated: Jul 18, 2014, 08:00 AM IST
नाराज राणेंची माणिकराव ठाकरेंनी काढली समजूत title=

मुंबई : उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री उशीरा राणेंची त्यांच्या जुहूच्या भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. 

या भेटीत माणिकरांवांनी राणेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र या चर्चेचा तपशील सांगण्यास माणिकरावांनी नकार दिला. तर सोनिया गांधींनीही नारायण राणे यांना फोन केला. त्यामुळे काँग्रेसकडून नारायण राणे यांची नाराजी दूर करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. 
 
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात राणेंनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. येत्या सोमवारी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा त्यांनी केलीय. सोमवारी ते राजकीय भूकंप घडवणार, हे जवळपास निश्चित झालंय. तर दुसरीकडे छगन भुजबळही राष्ट्रवादीला हात दाखवून, शिवसेनेशी संधान साधणार अशी चिन्हं दिसतायेत.

राणे आणि भुजबळ पक्ष सोडण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी दोघांवर टीका केलीय. राणे-भुजबळांची बंडाची ताकद सपंली असल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावलाय. 

नारायण राणे यांच्यासाठी शिवसेना-भाजपचे दरवाजे बंद आहेत, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले असताना महायुतीत पार्टनर असलेल्या रामदास आठवलेंनी मात्र राणेंना आरपीआयमध्ये येण्याचं आमंत्रण दिले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.