मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे यांना सोडून जाणाऱ्या त्यांच्या समर्थकांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. मुंबईतील काँग्रेस नगरसेवक अनिल पाटणकर यांनी त्यांच्या नगरसेवकपदाचा राजीनामा देत नारायण राणेंना धक्का दिलाय. ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
अनिल पाटणकर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहे, असे सांगण्यात आले. आमदार नितेश राणे यांच्या कारभाराला कंटाळून काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याचं त्यांनी सांगितले. नितेश राणेंनी आपली फसवणूक केली असल्याचा त्यांनी आरोप केला.
राजकीय नव्हे तर वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितले. महापौर स्नेहल आंबेकर आणि आयुक्त अजोय मेहतांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा सोपवला. चेंबूरच्या घाटला व्हिलेज प्रभागातून ते निवडून आले होते. तसेच राणेंसोबतच ते काँग्रेसमध्ये गेले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.