राधे मा झाली फरार, परदेशात पळण्याच्या तयारी, लुकआउट नोटीस जारी

स्वतःला देवीचा अवतार सांगणाऱ्या राधे माँ आता कायद्याचा कचाट्यात फसण्याची शक्यता वाढली आहे. माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी राधे माँ विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. 

Updated: Aug 7, 2015, 06:48 PM IST
राधे मा झाली फरार, परदेशात पळण्याच्या तयारी, लुकआउट नोटीस जारी title=

मुंबई : स्वतःला देवीचा अवतार सांगणाऱ्या राधे माँ आता कायद्याचा कचाट्यात फसण्याची शक्यता वाढली आहे. माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी राधे माँ विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. 

गुरूवारी समोर आलेल्या माहितीनुसार राधे माँ विरोधात मुंबईच्या उपनगरात एफआयआर दाखल करण्यात आली. हुंड्याच्या एका प्रकरणात राधे माँ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या वकील फाल्गुनी यांनी राधे माँ विरोधात बोरिवलीच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. राधे माँ भक्तांना फसवत असल्याचा आरोप आहे. 

निक्की गुप्ता या महिलेकडून राधे माँ सह ७ जणांवर केस दाखल करण्यात आली आहे. निक्की गुप्ताचा आरोप आहे की राधे माँ तिच्या जीवनात आल्यावर तिचे जीवन नरकापेक्षा वाईट झाले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.