वांद्रे पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची काँग्रेसला साथ

वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला राष्ट्रवादी साथ देणार असल्याचं स्पष्ट होत आहे. वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नारायण राणे यांना काँग्रेसकडून तिकिट मिळण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 22, 2015, 10:10 PM IST
वांद्रे पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची काँग्रेसला साथ title=

मुंबई : वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला राष्ट्रवादी साथ देणार असल्याचं स्पष्ट होत आहे. वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नारायण राणे यांना काँग्रेसकडून तिकिट मिळण्याची शक्यता आहे.

वांद्रे पूर्वच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपला उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि शरद पवार यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादीने निर्णय घेण्यात आला आहे.
 
शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ११ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. शिवसेनेतर्फे बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

भाजपने यापूर्वीच उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे, तर काँग्रेसतर्फे नारायण राणे रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत. त्यामुळे राणे यांनी पवारांशी उमेदवार न देण्याबाबत चर्चा केल्याचं वृत्त आहे.

तासगावचं काय?
राष्ट्रवादी नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आबांच्या पत्नीला राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी आबांच्या पत्नीविरोधात उमेदवारी न देण्याची विनंती राष्ट्रवादीतर्फे सर्वपक्षीयांना करण्यात आली होती. 

विनंतीला मान ठेवत कुठल्याही पक्षाने उमेदवार न दिल्यामुळे राष्ट्रवादीनेही नैतिक जबाबदारीने उमेदवार देण्याचं टाळलं असल्याचं म्हटलं जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.