मुंबई : मुंबईला ९५ वर्ष अथक सेवा देणाऱ्या डीसी ऊर्जाप्रवाहावर चालणाऱ्या लोकल ट्रेनने अखेर शनिवारी रात्री उशिरा मुंबईकरांचा निरोप घेतला. रात्री ११.३० वाजता देशातील शेवटची डीसी लोकल कुर्ल्याहून निघाली आणि रात्री १२.२५ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचली.
आपल्या लाडक्या डीसी ट्रेनला निरोप देण्यासाठी मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या ट्रेनच्या मार्गावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संगीत आणि नृत्यांच्या साथीने या ट्रेनला निरोप देण्यात आला.
रात्री उशिरा देशातील शेवटच्या मार्गाचे डीसी प्रवाहावरुन एसी प्रवाहावर परिवर्तन करण्यात आले. यामुळे आता हार्बर मार्गावर १२ डब्ब्यांच्या ट्रेन चालवणे शक्य होणार आहे.
After 91 yrs, DClocal retires.Last chance 2 travel in Last DC local Kurla Dep 2330 hrs CST Arr 2359 hrs on 9.4.2016 pic.twitter.com/cDPQ5Abk1v
— Central Railway (@Central_Railway) April 8, 2016
Last DC local passing on to history at CST pic.twitter.com/PpukyNQ2Tc
— Central Railway (@Central_Railway) April 9, 2016
Flash mob on arrival of last DC local at CST pic.twitter.com/pgxgxTsEh1
— Central Railway (@Central_Railway) April 9, 2016