हल्ला पूर्वनियोजीत, सरकार बरखास्त करा - ठाकरे

सीएसटी हिंसांचारानंतर आता त्याचे राजकीय पडसाद मटण्यास सुरुवात झालीय.. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार अपयथी ठरल्याची टीका करत, हे सरकार बरखास्त करा, अशी मागणी शिवसेनेनं केलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 12, 2012, 02:38 PM IST

www.24taas.com,मुंबई
सीएसटी हिंसांचारानंतर आता त्याचे राजकीय पडसाद मटण्यास सुरुवात झालीय.. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार अपयथी ठरल्याची टीका करत, हे सरकार बरखास्त करा, अशी मागणी शिवसेनेनं केलीय. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होवू लागले आहे.
राज्यातली परिस्थिती लक्षात घेता, राष्ट्रपती प्रमव मुखर्जी यांनी दखल घेत राज्यात राष्ट्रपती शासन लागू करावे, अशी मागणी शिवसेनेनं केलीय. गृहखात्याचा कणाच मोडल्याची टीकाही त्यांनी केलीय.
सीएसटी हिंसाचार पूर्वनियोजित असल्याची शक्यता क्राईम ब्रांचच्या तपासात पुढे येतेय. त्यामुळं आता या दिशेनं तपास सुरु आहे. घटनास्थळी हॉकी स्टिक्स, इंधनाचे डबे आणि मोठे दगड सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आत्तापर्यंत याप्रकरणी २३जणांना अटक करण्यात आलीय. या २३ जणांना १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. विशेष म्हणजे हिंसाचार करणा-या जमावानं पोलिसांची हत्यारं पळवल्याचंही उघड झालय.
तसच या जमावानं महिला पोलिसांची छेडछाड केल्याची माहितीही समोर येतीय. या आरोपींना किला कोर्टात हजर केलं जाणारयं. . दरम्यान महिला पोलिसांच्या छेडछाडप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल आसाममधल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या मोर्चातील जमाव अचानक हिंसक झाला. त्यांनी सीएसटी परिसरात जाळपोळ केली.